दोस्तांनो, ‘गुगल’ हे जगातलं सर्वोत्तम सर्च इंजिन आहे. इथे एखादी माहिती, बातमी किंवा साईट सर्च करायची असेल तर सर्चबारमध्ये जावं लागतं. या सर्चबारमध्ये तुम्हाला विविध कंपन्या, वेबसाईट्स तसंच बातम्या दिसतात. गुगलच्या पहिल्या पानावर स्थान मिळविण्यासाठी कंपन्या, वेबसाईट्समध्ये चढाओढ असते. कोणत्या साईटला पहिल्या पानावर स्थान द्यायचं गुगल ठरवतं. हे ठरवण्याची गुगलची एक पध्दत आहे. गुगल प्रत्येक साईटला मानांकन म्हणजे रँक देतं. या प्रक्रियेला ‘अल्गोरिदम’ असं म्हटलं जातं. ही प्रक्रिया नेमकी काय आहे याविषयी....
कसं मिळतं मानाकंन?
सर्वाधिक वाचल्या गेलेल्या किंवा सर्च केल्या गेलेल्या वेबसाईट्स, बातम्या, कंपन्या तसंच इतर बाबींना गुगल पहिल्या पानावर स्थान देतं. कोणती बातमी किंवा साईट किती शेअर केली आहे सुध्दा गुगल बघतं.
क्लिक
वेबसाईट किंवा माहितीवर करण्यात आलेल्या क्लिकच्या आधारे मानाकंन ठरतं. क्लिक जास्त तेवढं मानांकन वर येण्याची शक्यताही जास्त. एखाद्या साईटला मिळणारे क्लिक कमी झाले तर ती साईट दुसऱ्या किंवा तिसऱ्या पानावर जाते.
बाउंस रेट
साईटचा बाउंस रेट जास्त असेल तर मानाकंन खाली घसरु शकतं. लोकांना साईटवरची माहिती. आवडली नाही तर बाउंस रेट वाढतो.
सरासरी वेळ
युजरने वेबसाईटवर किती वेळ घालवला किंवा एखादी माहिती किती वेळ वाचली यावरुन गुगल मानाकंन ठरवतं.
कुठून मिळाली माहिती?
एखाद्या साईटची किंवा वृत्ताची माहिती कुठून मिळाली हे सुध्दा पाहिलं जातं. सोशल मीडिया किंवा थेट गुगलवरुन माहिती मिळते.